रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:10 IST)

माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मंजूर; जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी सध्या आहेत तुरुंगात

suresh jain
राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना आज मुंबई खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, आमदार, नगरसेवक यांना ऑगस्ट २०१८ महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता.
 
यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर दुसरीकडे माजी सुरेशदादा जैन यांना अनेक प्रयत्नानंतर २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला असून अटी, शर्थी सायंकाळी कळणार असल्याचे कळते. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला माध्यमांशी बोलतांना दुजोरा दिला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor