गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (20:45 IST)

काय म्हणता, 17 डुकरे चोरीला गेल्याची तक्रार दाखल, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका  व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. यात पाळलेल्या डुकरांपैकी 17 डुकरे चोरीला गेले आहे. त्याची किंमत साधारणपे 90 हजार रुपये आहे. नाशिकच्या ओझर येथील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या विकी किशोर गेचंद यांनी याबाबत ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने चोरीचा हा प्रकार समोर आला आहे. विक्री गेचंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ओझर पोलीस याबाबत तपास करीत आहे.
 
डुक्कर पाळण्याचा आणि त्याची विक्री करण्याचा विकी किशोर गेचंद यांचा व्यवसाय आहे. विविध प्रकारची डुक्करे ते पाळतात, त्यातील अनेक डुकरांचा वावर ओझर परिसरात असतो. विकी गेचंद यांच्या मालकीचे पाळीव डुक्कर नाशिक जिल्ह्यातील ओझर कचरा डेपो आणि परिसरातील शौचालयाच्या आजूबाजूला दिवसभर आणि रात्रीसुद्धा फिरत असतात.
 
मात्र, याच काळात डुक्कर मोजले असता पांढऱ्या रंगाचे सहा महीने गटातील जवळपास 17 डुक्करं अंदाजे 90 हजार किमतीचे डुक्कर चोरीला गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. गेचंद यांनी पहाटे पासून डुक्कर शोधण्यास सुरुवात केली. पण डुक्कर मिळत नसल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor