शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांचे निधन

रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील(९६ ) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कै. कडू पाटील यांच्या मागे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, अ‍ॅड. विजय आणि डॉ. विलास हे तीन मुले आणि चार मुली असा परिवार आहे.

सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब थोरात यांचे कै. कडू हे व्याही होत. कै. कडू पाटील यांनी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९४२ च्या महात्मा गांधी यांच्या चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत कै. कडू पाटील यांचा एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, साने गुरुजी यांच्याशी घनिष्ठ संबंध होता.