राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार - उदय सामंत

uday samant
Last Modified गुरूवार, 22 एप्रिल 2021 (21:59 IST)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणं अशक्य आहे.
त्यामुळे राज्यातील 13 विद्यापीठातील उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. या विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.

कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू होता. पण कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितलं.
परीक्षा ऑनलाईन घेत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली आहे.

कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठ, महाविद्यालये आणि संस्थाचालकांनी घ्यावी, अशी सूचना आजच्या (22 एप्रिल) बैठकीत करण्यात आली आहे.

13 ही अकृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा थांबल्या नाहीत. काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात या परीक्षा सुरू होत्या. पण बुधवारी (21 एप्रिल) राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास प्राधान्य द्यावे, अशी विनंती सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी केली होती. त्यामुळेच हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

पण कोणताही विद्यार्थी परीक्षेस वंचित राहणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, असा निर्णय झाला आहे.

विद्यापीठांच्या सर्वच परीक्षा म्हणजेच सर्वच वर्ष आणि सेमिस्टरच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच होतील.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींसाठी तसंच उच्चशिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण विभाग अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करावा, अशी विनंती कुलगुरुंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं सामंत म्हणाले.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

या सेक्टरचे वर्क कल्चर बदलले आहे! आता कर्मचाऱ्यांना ...

या सेक्टरचे वर्क कल्चर बदलले आहे! आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागेल
आठवड्यात 3 दिवस सुट्टीसाठी दीर्घ चर्चा सुरू आहे. आता सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी ...

ग्रॅच्युइटीचे नियम बदलले, कोणताही दावा नवीन नियमानुसार लागू ...

ग्रॅच्युइटीचे नियम बदलले, कोणताही दावा नवीन नियमानुसार लागू होईल
मोदी सरकारने केंद्रीय नागरी सेवा (नॅशनल पेमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅच्युइटीचे पेमेंट) नियम, ...

जायकवाडी धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघणार

जायकवाडी धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघणार
जायकवाडी धरणात पाण्याची आवक जोरात सुरु आहे. परिसराला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ...

'या' रुग्णालयात आतापर्यंत ३५ हजार कोरोनाप्रतिबंधक लसीचे डोस ...

'या' रुग्णालयात आतापर्यंत ३५ हजार कोरोनाप्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले
शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महावीर जैन हॉस्पिटल आणि ...

अनिल परब यांची ईडीकडून तब्बल सात तास चौकशी

अनिल परब  यांची  ईडीकडून तब्बल सात तास चौकशी
शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने (ED) समन्स बजवला ...