मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 6 जुलै 2022 (20:58 IST)

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी

bhawana gavli
लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी  यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं असून भावना गवळी यांना प्रतोद पदावरुन हटवण्याची विनंती केली आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं होतं. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा, ही विनंती", असं आवाहन भावना गवळी यांनी केलं होतं.