आमदाराने केली संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीत टीका
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अखेरीस शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. काल पर्यंत मांडीला मांडी लावून बसणारे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
यातच आता आणखी एका नवीन वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. संजय राऊत बारा बापाचा नसेल तर राजीनामा दे असं आव्हान संजय गायकवाड यांनी केलं आहे. तसेच पुढे गायकवाड म्हणालेत संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, ते असाही आरोप आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. आता शिंदे गटातील आमदारांच्या मनात असलेला संजय राऊत यांच्या बद्दल सर्व अधिकच तीव्र होताना दिसत आहे.
सत्तांतराच्या नाट्यानंतर आमदार संजय गायकवाड बुलडाणा या आपल्या मतदारसंघात परतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांची संवाद साधला.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळू दिला नाही असे म्हणत उलट आमच्याच तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या, त्यामुळे सर्वच आमदार व्यथित होते. असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. तसेच आता सर्वत्रच शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला असताना या प्रश्नावरही त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत गायकवाड म्हणालेत शिवेसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.