शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (16:57 IST)

CM एकनाथ शिंदेंच्या बायकोने ड्रम वाजवत विजयोत्सव आनंदात साजरा केला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या आनंद त्यांच्या बालेकिल्ला म्हणजे ठाणे, जिल्ह्यासह मुंबईत जल्लोषाचे वातावरण आहे. एकनाथ मंत्री यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी विजयोत्सव उत्साहात आनंदात साजरा केला.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा ढोल वाजवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या गुलालात माखल्या असून चेहऱ्यावर आनंद आहे आणि त्या ड्रम वाजवत आहे.  
 
भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाण्यातील शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात केली आणि जल्लोष केला. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार हे समाजतातच त्यांच्या बालेकिल्ला ठाणे आणि मुबई क्षेत्रात जल्लोष करण्यात आला. या वेळी एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ढोल ताश्यांच्या गजरात पेढे वाटप करण्यात आले, गुलाल उधळला, भगवे झेंडे हातात घेऊन समर्थक ढोल ताश्याच्या तालावर जल्लोष करत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा करत होते. या वेळी त्यांच्या पत्नीचा आनंद त्यांना लपवता आला नाही त्यांनी आपल्या पती एकनाथ शिंदे यांच्या विजयोत्सवाचा ड्रम वाजवून आनंदाने उत्साहाने सादर केला.