1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (17:45 IST)

पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

eknath shinde
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्याला दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. येत्या काही दिवसातच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले की, त्यांचे सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करणार आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाणार असल्याची माहिती सभागृहात दिली.यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, आणि आज आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले आहे.
 या राज्यांचं सर्वांगिन काम करणारं सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू.शेतकऱ्यांसाठी देखील काही असं नियोजन करू जेणे करून ते आत्महत्या करणार नाही