शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (19:38 IST)

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बहुमत सिद्ध केले असून आज ते मुख्यमंत्री कामावर रुजू झाले त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या पदाधिकारी आणि आमदारांसह गणरायाची विधीपूर्ववक पूजा केली आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले आणि राज्यातील नव्या सरकार मध्ये यशस्वीरीत्या काम करेन त्यासाठी मला बळ येण्यासाठी आपला आशीर्वाद माझ्यावर असू द्या अशी प्रार्थना आणि मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 
या वेळी मंदिरातील गुरुजींनी मुख्यमंत्र्यांना गणपतीचं मानाचं नारळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार आणि स्वागत केलं.मुख्यमंत्र्यांनी अगदी साधेपणाने सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचं दर्शन घेतलं.या वेळी दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि इतर महत्वाचे आमदार देखील होते.