बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (08:24 IST)

१० वीच्या परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे काम अपुरे राहिले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाने दिलासा दिला आहे. बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठीच्या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे परिपत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. 
 
आता दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकणार आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याअगोदर अर्ज भरण्यासाठी आज ११ जानेवारी पर्यंतच मुदत होती. ती वाढवून २५ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना वेबसाईट हॅक होण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज करणे राहिले आहे. आता मुदतवाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.