1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 18 मार्च 2023 (21:23 IST)

गोपीनाथ गड लोकापर्ण सोहळ्याला फडणवीस अनुपस्थित, चर्चेला उधाण

gopinath gad
नाशिक जिल्ह्यामधील  सिन्नर तालुक्यातीस नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे आदी उपस्थित लाभली. मात्र, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे लोकापर्ण सोहळ्याच्या प्रसिद्धीसाठी दिलेल्या विविध दैनिकांमधील जाहिरातमधुनही फडणवीस यांचा फोटो गायब आहे.  
 
दुसरीकडे फडणवीस यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी अन्य कार्यक्रमांना वेळ दिली होती. त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत, असे आयोजकांनी सांगितले आहे. मात्र, फडणवीस यांनी मुद्दामच या कार्यक्रमाला वेळ दिला नाही की अन्य काही कारण आहे याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
 
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच, त्यांना विधान परिषदेवरही संधी देण्यात आलेले नाही. त्यांना सातत्याने डावलले जात असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात अप्रत्यक्षरित्या पंकजा यांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखविली आहे. यामुळेच फडणवीस यांना या कार्यक्रमाला बोलविण्यात आले नसल्याचेही सांगितले जात आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor