गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (20:57 IST)

राज ठाकरे आणि नारायण राणे यांची भेट, कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

raj thackeray narayan rane
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी नारायण राणेंनी भेट घेतली. नारायण राणे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी जवळपास दीड तास या दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही काळ नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांच्या गॅलरीत गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन नेत्यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
 
या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत मुंबई-गोवा महामार्गाविषयीही दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor