रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (07:41 IST)

दीड कोटींच्या गजेंद्रची चर्चा

gajendra
सोलापुरात सध्या बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गजेंद्र नाव असलेल्या पाच वर्षांच्या या रेड्याला हरियाणातील मंडळींनी तब्बल दीड कोटीत विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. सोलापुरात प्रसिद्ध सिद्धेश्वर देवस्थानाकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात बेळगावमधील शेतकऱ्याचा हा ‘गजेंद्र’ सहभागी झाला होता. छोट्या हत्तीसारखा दिसणारा हा रेडा रोज 10 लिटर दूध पितो. त्याचा रोजचा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या रेडयापासून मालकाला रोज किमान दहा हजार रुपये उत्पन्न सुद्धा मिळते.
Edited by : Ratnadeep Ranshoor