शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 25 डिसेंबर 2022 (15:10 IST)

सोलापुरात 106 वर्षांच्या आजीला पुन्हा आले दात

सहसा दात बाळ जन्माला आल्यावर येत नसतात. दात हळूहळू येतात.बाळाचे दात सहाव्या वर्षांपासून पडायला सुरु होते. नंतर नवीन दात येतात.आणि वृद्धत्व आल्यावर माणसाचे संपूर्ण दात पडतात. म्हतारपणात सर्वच दात पडतात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात चपळगांव येथे आश्चर्यजनक घटना घडली आहे. सोलापुरात वयाच्या 106 व्या वर्षी एका आजींना पुन्हा दात आले. धानव्वा उटगे असे या आजींचे नाव आहे.

विशेष म्हणजे आजींचे हे दात दुधाचे आहे. दुधाचे दात परत आल्यामुळे घरात जणू आनंदाचे वातावरण होते.दुधाचे दात परतले म्हणून घरातील सदस्यांनी आजीचा सन्मान करण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांच्या साठी पाळणा सजवला आणि एखाद्या बाळा प्रमाणे आजींना टोपी घालून फुलांचा हार घातला आणि बाळाच्या बारशाच्या कर्यक्रमा प्रमाणे आजींना पाळण्यात घातले. धंनव्वा आजी या 106 वर्षाच्या असून गेल्या 40 वर्षांपासून एकदा जेवतात आणि दररोज सकाळी योगा करतात. त्यांची जीवनशैली चांगली असल्यामुळे त्या तब्बेतीने धड धाकडं असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
 
Edited by - Priya Dixit