सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (21:06 IST)

फडणवीस यांचे ट्विट म्हणाले जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही

devendra fadnavis
जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. बुलढाण्यात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. कृषी वीज देयक वसुलीबाबतचे महावितरणाचे पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. तसेच, “जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे”,अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलही केला.

Edited by : Ratnadeep Ranshoor