रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (19:31 IST)

शपथविधीनंतर फडणवीस यांची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक

Chief Minister Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, NDA नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत ते महिलांसाठी मोठी घोषणा करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक गुरुवारी सायंकाळी सात वाजता सुरु झालीआहे.  
 
यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यांचे 132 आमदार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने 57 आमदार जिंकण्यात यश मिळविले आहे, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 41 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहे. याशिवाय 3 जागांवर भाजपच्या मित्रपक्षांना यश मिळाले आहे.