1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Farmers association blocks road on Pune Bengaluru highway

ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न

उसाला प्रति टन ४,५०० रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.तसेच कोल्हापूरजवळील किणी टोलनाका, तसेच सातारा जिल्ह्यातील नागठाणे, तासवडे आणि आनेवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून धरला आहे. माहितीनुसार ऊसाला प्रति टन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी आणि इथेनॉलचा खरेदी दर प्रति लीटर ७० रुपये करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेसंघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर धरणे आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तसेच महामार्ग पूर्णपणे रोखल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मैलोन्मैल लांबच लांब रांगा लागल्या आहे. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना (एसएसएचएस) गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर आंदोलन करत आहे. उसाच्या पहिल्या हप्त्याच्या मुद्द्यावर प्रशासन आणि साखर कारखानदारांसोबत दोन फेऱ्यांची चर्चा झाली, परंतु कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. यानंतर, संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी संघटनेने आधीच तयारी केली होती. शेतकरी आणि नागरिकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यासाठी जवळच्या गावांमध्ये रॅली काढण्यात आल्या. राजू शेट्टी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर उतरून वाहतूक रोखली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने किनी टोल नाक्याजवळ कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोल्हापूरकडे जाणारी वाहने फाटा मार्गाने, तर पुण्याहून येणारी वाहने वाघावाडी फाटा मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे किनी टोल नाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ऊसासाठी प्रति टन ४,५०० रुपयांच्या पहिल्या हप्त्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे साखर कारखानदार आणि प्रशासनावर दबाव वाढला आहे. आता प्रशासन आणि साखर कारखानदार व्यवस्थापन या मागणीवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील लेख
आदेश देऊनही अतिक्रमणे हटवले नाही; सर्वोच्च न्यायालयाने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना फटकारले