1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Farmers on strike, milk and vegetables poured on the road

शेतकरी संपावर, दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतला

शेतकरी संपावर गेल्यावर राज्याच्या विविध भागात शेतमालाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटना घडल्या. शेतमाल शहरांपर्यंत पोहचू नये यासाठी आंदोलकांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतून दिला. निफाड तालुक्यातील टाकळी फाटा येथील संतप्त शेतकऱ्यांनी निफाड चांदवड मनमाड त्रिफुली येथे आज पहाटे तीन वाजता नांदगाव वरून नाशिककडे जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या असलेल्या गाडया अडवून ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या. तर नाशिकच्या लासलगाव जवळील औरंगाबाद हमरस्त्यावर एका दुधाच्या टॅकरमधून दुध खाली करीत असताना एमएच 15 ए ए 3061 या लासलगाव  पोलिसांच्या जीपवर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करीत 21 पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन निफाड येथील पोलीस कोठडीत ठेवले  आहे.
पुढील लेख
12 नंबरची टोपी घालून युवराज सज्ज!