शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

12 नंबरची टोपी घालून युवराज सज्ज!

लंडन- विराट ब्रिगेडच्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली. भारताचा डॅशिंग ऑलराऊंडर युवराजसिंग हा तापातून सावरला असून तो टीम इंडियाच्या डिनर प्लॅनमध्येही सामील झाला होता.
 
युवीने त्याची ओळख बनलेली 12 क्रमांकाची कॅप परिधान केली होती. या बारा आकड्याचा संबंध युवराजच्या 12 डिसेंबर या वाढदिवसाच्या तारखेशी आहे. त्यामुळेच युवीने 12 हा आपला ब्रॅण्ह बनवला आहे. पर तोच युवराज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणशत पाकिस्तानाचे बारा वाजवणार का?, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कारण युवी तापातून सावरला असला तरी तो 4 जूनच्या सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने सामन्या करता फिट आहे का, याची चाचपणी झालेली नाही.
 
दरम्यान, आजारी युवराजची देखभाल करण्यासाठी त्याची पत्नी हेजलही लंडनमध्ये दाखल झाली आहे. ती युवीसोबतच राहात असल्याने त्याची काळजी घेण्याची टीम ‍इंडियाची चिंता दूर झाली आहे.