रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (08:44 IST)

धुळ्यात गणपती विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात, 3 मुलांचा मृत्यू

accident
धुळे : महाराष्ट्रातील धुळ्यात गणपती विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात झाला. तसेच या अपघातात तीन मुलांचा मृत्यू झाला तर सुमारे पाच जण जखमी झाले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील चित्तोड गावात विसर्जनासाठी नागरिक गणपती बाप्पाची मूर्ती ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात होते. तसेच त्यानंतर ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोकांवर ट्रॅक्टर गेला. ट्रॅक्टरच्या खाली येऊन यामध्ये ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
चालक दारूच्या नशेत होता- 
तसेच पोलिसांनी ट्रॅक्टर आणि चालकाला ताब्यात घेतले असून सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याचे नियंत्रण सुटले.
 
तसेच यामध्ये मृत आणि जखमींची ओळख पटली आहे. शांताराम (13), शेरा बापू सोनवणे (6) लड्डू पावरा (3) अशी मृतांची नावे आहे. तर गायत्री (25), विद्या जाधव (27), अजय (23), उज्ज्वला चंदू (23), ललिता पिंटू मोरे (16) आणि रिया (17) अशी उपचार सुरू असलेल्यांची नावे आहे.

Edited By- Dhanashri Naik