1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (12:12 IST)

ठाण्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये टेरेसवर शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला

decapitated body was found in Thane
ठाण्यातील एका शॉपींगमॉलच्या टेरेसवर 35 वर्षाच्या व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.

सदर घटना कापूरबावडी परिसरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सुरक्षापर्यवेक्षकाला एक शिरविच्छेद केलेला मृतदेह आढळला. त्याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.   

सोमनाथ सदगीर असे या मयताचे नाव आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास सोमनाथ उदगीर यांनी संकुलात सुरक्षा रक्षकासोबत जेवण केले नंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या करण्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) हत्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit