गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (16:39 IST)

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

crime
मुंबईच्या कुर्ला परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात कौटुंबिक वादातून एका वडिलांनी आपल्या चार वर्षाच्या चिमुकलीची  जमिनीवर आपटून हत्या केली. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विनोबाभावे नगर येथे आरोपीचे आपल्या पत्नीशी वारंवार भांडण होत होते. आर्थिक त्रास आणि मुलांच्या संगोपनावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. शनिवारी देखील पती पत्नीमध्ये वाद झाले आणि ते वाद विकोपाला गेले.रागाच्या भरात आरोपीने पत्नीला मारहाण केली.नंतर आपल्या चार वर्षाच्या मुलीला उचलून जमिनीवर आपटले. या मुळे चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. नंतर कुटुंबियांनी चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. उपचाराधीन असता चिमुकलीचा मृत्यू झाला. 
घटनेनंतर आरोपीच्या विरुद्ध  पोलिसांनी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit