Maharashtra Marathi Breaking News Live Today: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती युती म्हणून लढवेल परंतु स्थानिक परिस्थितीचा विचार करून काही निर्णय घेतले जातील. या विधानामुळे भाजप अप्रत्यक्षपणे या निवडणुका स्वबळावर लढण्याची रणनीती राबवत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
05:23 PM, 16th Feb
मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले
05:05 PM, 16th Feb
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले
04:43 PM, 16th Feb
मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या
04:25 PM, 16th Feb
नागपूरच्या कोतवालबुडी येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोटात दोघांचा मृत्यू
04:04 PM, 16th Feb
महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले
03:45 PM, 16th Feb
भाजप महापालिकेची 'निवडणुका स्वबळावर लढणार!
03:27 PM, 16th Feb
कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
02:59 PM, 16th Feb
बाळ दूध पीत नाही, नैराश्यात येऊन आईने घेतले टोकाचे पाउल, नागपुरातील घटना
02:43 PM, 16th Feb
मुंबईतील 11मजली इमारतीला भीषण आग,2 महिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
01:40 PM, 16th Feb
शनि शिंगणापुरात आता शनिदेवाला अभिषेक फक्त ब्रांडेड तेलाने करावा लागणार
आता 1 मार्चपासून शनि शिंगणापूर मंदिरात श्री शनिदेवाच्या मूर्तीला ब्रँडेड तेलाने अभिषेक केला जाईल. शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
01:29 PM, 16th Feb
GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर या कारणाने अजित पवारांचा इशारा
पुण्यात सुरू असलेल्या गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी लोकांना कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले
12:18 PM, 16th Feb
महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांमध्ये आता विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकवल्या जातील, राज्यपालांची घोषणा
11:06 AM, 16th Feb
लव्ह जिहाद कायद्यावरील वादावर रामदास आठवलेंचे मोठे विधान
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याचा वाद जोरात सुरू झाला आहे. यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेही मोठे विधान समोर आले आहे
10:56 AM, 16th Feb
मुंबई प्रमाणे रामटेकमध्येही फिल्म सिटी बांधणार, राज्य सरकारने दिली मंजुरी
10:54 AM, 16th Feb
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे.