शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (17:39 IST)

Pandharpur मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा मृत्यू

Pandharpur News पंढरपुरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. घरात लग्नकार्य सुरू असताना मुलाच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली. सुभाष देवमारे असे मृत पित्याचे नाव आहे.
 
पंढरपुरात सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे याचा विवाह मंगळवारी दुपारी होता. अशात सोमवारी रात्री डॉल्बीच्या दणदणाटात हळदीची वरात काढली जात होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे नवरदेवाचे पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखले केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
 
डॉल्बीच्या अति आवाजामुळे आणि दणदणाटामुळे सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.