रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (19:17 IST)

Pandharpur : अधिक मासात विठूरायाची पाद्यपूजा बंद

vitthal rukmani
विठ्लाचे दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मात्र आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने घेतलेल्या निर्णयामुळे विठ्ठलाच्या भाविकांना अधिकमासात पाद्यपूजा करता येणार नाही.   
 
आषाढी एकादशी नंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दूरवरून येतात. येणाऱ्या भाविकांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी मंदिर प्रशासन घेते. आषाढी प्रमाणे अधिक मासात देखील भाविक विठ्ठलाचे दर्शन करायला येतात. या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी होते. 
 
यंदा अधिकमासाच्या अनुषंगाने पंढरपूर मंदिर समितीच्या व्यवस्थापकां कडून अधिक मासात विठ्ठलाची पाद्यपूजा आणि तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   
यंदा अधिक मास 18 जुलै पासून सुरु होत आहे. त्यानुसार, विठ्ठलाची पाद्यपूजा 17 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत बंद राहील. 
 



Edited by - Priya Dixit