रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (10:01 IST)

सतत अपमान करणाऱ्या मुलाचा बापाने असा काढला काटा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील संतोष हनुमान कुरधने या 22 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून  झाला होता. या खून प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून तपास करत संतोषचा मारेकरी असलेला त्याचा बाप हनुमान कुरधने हेच आहेत हे उघडकीस आणले आहे. माझा मुलगा वारंवार चारचौघात अपमान करतो याचा राग त्यांनी मनात धरून मीच त्याचा खून केल्याची कबुलीही आरोपीकडून त्या बापाने दिली आहे. देण्यात आली दरम्यान पोलिसांनी हनुमान कुरधने यास अटक केली.
 
तालुक्यातील रामखेडा येथे स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या संतोष कुरधनेचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली होती. कुरधने कुटुंब गेल्या १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. त्याच वेळी स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोषचा डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत तपास केला असता संतोषचे वडील हनुमान कुरधने याच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यातून पोलिसांना शंका आली आणि पोलिसांनी सर्व पद्धतीने पुरावे आणि तपास करत त्या बापाला पकडले आहे.