शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (12:04 IST)

वडिलांकडून मुलाची गळा चिरून हत्या

murder
अंबरनाथमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटतेन बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे कळून येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर येथील ही घटना आहे. 
 
आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकण्याच्या प्रयत्नात असतानाच आरोपी बापाला स्थानिकांनी बघितले. त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आनंदकुमार गणेश असं आरोपीचं नाव आहे. 
 
आरोपी परिसरात गटार आणि चेंबर साफ करण्याचं काम करत असून त्याला दारूचं व्यसन होतं. पत्नी आणि मुलगा वेगळं राहत असल्याच्या रागातून त्याने मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
 
माहितीनुसार आरोपी आनंदकुमार गणेश हा अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरात राहात असून चेंबर साफ करण्याचं काम करतो. मात्र त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याचं कुटुंब त्याच्यापासून वेगळं राहात होतं. मुलगा आकाश भाजी विकत कुटुंबाला हातभार लावत असे. मात्र बुधवारी रात्री आरोपी बापाने आपल्याच मुलाची गळा चिरून हत्या केली आणि मुलाचा मृतदेह नाल्यात फेकून देण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.