1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. FDA conducts major raids across the state

महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई; डॉमिनोजसह १०४ चेन रेस्टॉरंटवर छापे, पाच रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी राज्यभरात मोठी छापेमारी आणि तपासणी मोहीम राबवली. मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या तीन आस्थापनांसह पाच चेन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दोन आस्थापनांना तात्काळ कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत, महाराष्ट्र एफडीएने १०४ चेन रेस्टॉरंटची तपासणी केली. मुंबईतील डॉमिनोजच्या तीन आउटलेटसह पाच चेन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आणि ९५ आस्थापनांना सुधारणा सूचना  बजावण्यात आल्या. याव्यतिरिक्त, प्रतिबंधित खाद्यपदार्थांसाठी १५ आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये अंदाजे २५.९७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला, १२ एफआयआर नोंदवण्यात आले, १५ जणांना अटक करण्यात आली आणि नऊ आस्थापना सील करण्यात आल्या. एफडीएने भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे, चुकीचे लेबल लावलेले आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांविरोधात राज्यभरात कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी, आठवड्यातील दुसरी घटना