सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 मार्च 2018 (10:27 IST)

'त्या' डॉक्टरवर गुन्हा दाखल

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात एका डॉक्टरनं मांत्रिकाला बोलावून एका अत्यवस्थ महिलेवर तंत्रमंत्राचा वापर केल्याचं प्रकरण पुढे आलंय. याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली होती. आरोपी डॉक्टर सतीश चव्हाण या महिलेवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या महिलेची तब्येत खालावल्याने मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना डॉक्टर सतिश चव्हाण एका मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकाने रुग्णालयातच त्याचे तंत्र मंत्र विधी केले. याच चव्हाण डॉक्टरवर जादूटोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.