रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

किसान मोर्च्यामागील तीन चेहरे

सुमारे 40 हजार शेतकरी आपल्या पायाची वारी करत मुंबईत पोहचले आपल्या मागण्या मांडण्यासाठी. राजकारणी ते सामान्य माणूस हे बघून हैराण आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र झाले तरी कसे आणि आंदोलना वळण दिले तरी कसे?
 
जीवा पांडू गावित हे महाराष्ट्राच्या त्या राजकारणी लोकांमध्ये सामील आहे ज्यांची ओळख त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आहे. आदिवासी समुदायाहून येणारे जीवा कालवन सात वेळा विधायक राहिलेले आहे. ते महाराष्ट्राच्या लेफ्टचा फेस मानले जातात. या आंदोलनात आदिवासी सामील होण्यामागे यांची योजना असल्याचे मानले गेले आहे. जीवा वन अधिकार कानून 2006 अंतर्गत आदिवासी लोकांना त्यांची पुश्तैनी जमिनीचा मालकीचे हक्क दिलवण्यासाठी लढत आहे. 
 
अशोक धावले हे काही काळापूर्वीच अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष निवडण्यात आले असून ते यापूर्वी कम्युनिस्ट पक्षाशी जुळलेले होते. ते सामाजिक कार्यकर्ता गोदावरी पारुलेकर यांना आदर्श मानत होते. किसान सभेचे अध्यक्ष बनवण्यापूर्वी ते 1993 मध्ये ठाणे आणि पालघर येथे कृषी संबंधित मुद्दे, स्वामीनाथन कमिशन चे वन कायद्याशी जुळलेली शिफारसी इत्यादीबद्दल आपली आवाज उचलत असे. धावले यांनी बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आणि मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे प्रोजेक्ट विरुद्ध प्रदर्शन केले आहेत. 
 
अजीत नवाले हे 2017 मध्ये किसान आंदोलनाचे सर्वात प्रमुख चेहरा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कर्ज माफी स्कीम आणि पिकाचे 1.5 पट न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणा केली होती. त्यावेळी शेतकर्‍यांनी फळ- भाज्या शहरात न पाठवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने तयार केलेल्या समितीत नवाले हेही होते.