मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधींचा किसान मार्चला पाठिंबा

Rahul Gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रच्या शेतकर्‍यांना पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना अपील केली आहे की त्यांनी अहंकार त्यागून शेतकर्‍यांच्या मागण्या मंजूर कराव्या. राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटले की काँग्रेस महाराष्ट्रात आपल्या मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध मार्च काढण्यात असलेल्या शेतकर्‍यांसोबत आहे.
 
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी प्रतिनिधिमंडळाशी भेट घेतली असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले आहे.
 
उल्लेखनीय आहे की 50 हजाराहून अधिक शेतकरी सुमारे 180 किमी दूर नाशिकहून पायी चालत मुंबईला पोहचले आहेत. किसान मार्चमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हंगामा सुरु आहे.