शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (14:41 IST)

पुणे: पॅनकार्ड क्लब इमारतीला आग

fire at pan card club in Pune
पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत.
 
सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक येथील डोमला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आगीमुळे चारी बाजूला दूर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत. डोमला आग लागली असून ती आग पसरण्याची शक्यता असल्यामुळे विविध बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्न केले जात आहे. 
 
घटनेवळी क्लबमध्ये कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे कारण सध्या समजू शकलेले नाही.