नाशिकच्या चांदवड घाटात धावत्या एसटी बसला आग, सर्व प्रवासी सुखरूप
social media
सदर अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावरील खोकड तलावासमोर असलेल्या एका लॉजिंग समोर अचानक एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतला.
बस शहादा ते नाशिक मार्गावर जाणाऱ्या एसटीच्या बसला लागली.बस मध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
बसने पेट घेतला बघून बस चालकाने आणि वाहकाने तातडीने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.
सर्व प्रवासी खाली उतरल्यावर आगीने बसला वेढले आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसचालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बचावले.
घटनेची माहिती मिळतातच चांदवड अग्निशामक दल आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली.
Edited By - Priya Dixit
