रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (17:39 IST)

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग

गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे व कचऱ्याला आग लागून नऊ घटना घडल्या होत्या, तर यंदा ते प्रमाण १७वर पोहोचले आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींवर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवित मोठी हानी टाळली आहे. तर, ठाणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद या विभागाकडे करण्यात आली आहे.

यावर्षी ठाणे शहरात दिवाळीदरम्यान म्हणजेच ६ ते ९ नोव्हेंबरपर्यंत फटाके आणि फटाक्यांच्या कचऱ्यामुळे आग लागलेल्या घटना या लोकमान्यनगर, कळवा, वागळे, वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, दिवा, उथळसर, नौपाडा-कोपरी परिसरात घडल्या आहेत. या चार ते पाच दिवसांत शॉट सर्किटमुळे, फटाके, कचरा अशा कारणांमुळे एकूण ५२ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. तर, गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांत २० ठिकाणी आग लागल्याची नोंद आहे. फटाक्यांमुळे तसेच शॉट सर्किटमुळे जरी आग लागल्याच्या घटना असल्या तरी यावर्षी या घटना दुप्पट वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.