मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट 5 दिवसांपासून बेपत्ता, शोधमोहीम सुरू
रत्नागिरीमध्ये मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली एक बोट जवळपास 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. या बोटीमध्ये मासेमारी करण्यासाठी सहा जण गेले होते.
'नावेद २' असं नाव असलेली ही बोट 26 ऑक्टोबरपासून सापडत नसल्याची तक्रार बोटीचे मालक नासीर संसारे यांनी दिली, त्यानंतर प्रशासन शोध घेत आहे.
प्रशासनाच्या वतीनं स्पीड बोट आणि खासगी बोटींच्या माध्यमातून ही बेपत्ता बोट शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा जयगडमधून ही बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली होती.
बोटीवर असलेले सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत. दरम्यान, शोधमोहिमेत एक मृतदेह मिळाला असून तो बोटीमध्ये असलेल्या कुणाचा आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.