सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:24 IST)

५० लाखांच्या मद्यासह पाच जणांना येवला येथून अटक

गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना येवला येथून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मद्य आणि आयशर गाडीसह सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
गोव्याची दारू पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरून मद्यतस्करी करण्याचा नवा फंडा सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले व गोवा राज्यात निर्मित अशा विदेशी दारूची अवैध वाहतूक केली जात असलेला आयशर ट्रक येवला तालुक्यात येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने सापळा रचून दुपारी चारच्या सुमारास सदर गाडी शिताफिने ताब्यात घेत ही कारवाई केली
 
या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याचे ३५० बॉक्स तसेच आयशर गाडीसह असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. त्याचबरोबर पाच संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज उत्पादन शुक्लच्या नाशिक विभागाने धडक कारवाईला सुरवात केली आहे. गोवा तसेच दिसू दमण येथील बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी गस्त वाढवली आहे. त्यामुळे सातत्याने कारवाईचा धडाका सुरु आहे.