सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:01 IST)

मनपा पोटनिवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार

सांगली महापालिका वार्ड क्रमांक सोळा च्या पोटनिवडणुकीची सायंकाळी साडेपाच वाजताची अंतिम मतदानाची टक्केवारी 49. 98% इतकी झाली आहे. महापालिकेच्या वार्ड क्रमांक 16 च्या आज झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी  सकाळी दहा वाजता स्टेशन चौक, सांगली येथील महापालिकेच्या जुन्या घरपट्टी कार्यालयात होणार आहे या मतमोजणीसाठी 9 टेबल लावण्यात येणार असून अंदाजे चार फेऱ्या मध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. साधारणपणे दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.