शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (08:36 IST)

Road Accident :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस आणि ट्रॅक्टरच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर जात असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरची धडक होऊन अपघात झाला. झालेल्या या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. बसमधील 44 जण आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी निघाले होते. बस वाटेतच ट्रॅक्टरला धडकली यामुळे बस आणि ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात कोसळली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बसमधील भाविक आषाढी एकादशी निमित्त केसर गावातून खासगी बसने पंढरपूर जात असताना अपघात घडला. 
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस आणि ट्रॅक्टरमध्ये धडक झाली. धडकेनंतर बस आणि ट्रॅक्टर दोन्ही खड्ड्यात पडले.

अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. रात्री 1 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. 
नवी मुंबई पोलिसांचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती दिली. 

Edited by - Priya Dixit