रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:14 IST)

भ्रष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र सलग तिसऱ्या वेळी तिसऱ्या स्थानावर

भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे. पुरोगामी समजल्या जाणारे राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्याने आपली ओळख कायम ठेवली आहे. सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचा शिक्क्का मोर्तब झाले आहे. आपल्या देशातील  राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध  केला असून ,  2016 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे 1 हजार 16 प्रकरणं घडली आहे. एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल 22.9 टक्के घटना यामहाराष्ट्रात घडल्या असून यामध्ये हेच आकडेवारी  2015 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या 1279 तर 2014 मध्ये 1316  ज्घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत 2016 मध्ये आकडेवारी थोडी  कमी झाल्याचं दिसत असल तरी क्रमांक तीन काही सुटला  नाही. 

महाराष्ट्राखालोखाल ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या 569 घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये 430 , मध्य प्रदेशमध्ये 402 , आणि राजस्थानमध्ये 387 प्रकरणं समोर आली आहेत. 

 

  • महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर 
  • सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशातच
  • उत्तर प्रदेशात 2 लाख  82 हजार गुन्ह्य़ांची नोंद 
  • मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर
मात्र खून होणे लुटपाट यामध्ये मात्र मुख्यमंत्री योगी यांचे उत्तर प्रदेश एक नंबर वर आहे. यामध्ये वर्षी खूनाच्या येथे सर्वाधिक 4,889 घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे 2 हजार 581 खून करण्यात आले आहेत.