बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (14:05 IST)

पैशाच्या पावसासाठी अंधश्रद्धेला भुलून , महिलेला जिवंत जाळले

Forgetting superstition for rain of money
जरी जग पुढे वाढत आहे. आधुनिक  जगात वावरणाऱ्या लोकांमध्ये काही लोकं असे देखील आहेत जे आज देखील अंधश्रद्धेला बळी पडत आहे .जगात आज देखील असे लोक काही भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकून आपले सर्वस्व पणाला लावतात . असेच काही घडले आहे . महाराष्ट्रातील  जळगाव येथे. शिवाजी नगर या भागात राहणाऱ्या एका 51 वर्षीय महिलेवर तिच्याच भाच्याने गोड बोलून या महिलेला एका अघोरी भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरून जिवंत जाळण्याचे अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .या घटनेची माहिती मिळतातच परिसरात खळबळ उडाली आहे .
या भाच्याला असं केल्याने  पैशाचा पाऊस पडेल असं मांत्रिक संतोष मुळीक याने सांगितले . मांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपी भाच्या ने हे अघोरी कृत्य केले . मांत्रिक आणि भाच्याने महिलेला जिवंत जाळून मृतदेह तापी नदीच्या पात्रात पुरून ठेवला . मयत माया या घरातून बेपत्ता झाल्या होत्या .पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींना शोधून काढल्यावर आरोपींनी गुन्हा कबूल केला असून या प्रकरणी जळगाव पोलिसांनी मुख्य मांत्रिकासह दोघांना अटक केली आहेत. माया दिलीप फरसे असे या मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला एक पापडाच्या कारखान्यात कामाला  होती . या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिक संतोष मुळीक याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.