सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (08:51 IST)

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी आज मतदान, OBC आरक्षणाविना पार पडणार निवडणूक

राज्याच्या 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायती आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी आज (21 डिसेंबर) मतदान होत आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार OBC प्रवर्गाच्या जागा वगळून उर्वरित जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
105 पैकी रायगड - पाली, पुणे - देहू, जालना - तीर्थपुरी आणि सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर, वैराग, नातेपुते या 6 नगरपंचायती नवनिर्मित आहेत.
स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. या जागांसाठी 18 जानेवारी 2022ला मतदान होणार आहे. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी 19 जानेवारीला होणार आहे.