सदावर्तेंनी वकिलाचं काम करावं, अन्यथा...- एसटी कामगार संघटनेचे नेते अजय गुजर यांचा इशारा
एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे. संप मागे घेतल्याची घोषणा करताना त्यांनी एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश झाले असून त्यांना कोणीतरी भडकावत असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख हा अडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे होता.
गुणरत्न सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही एसटी कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू, असंही त्यांनी म्हटलं.
सदावर्तेंनी एसटी कर्मचारी संप करत नसून दुखवटा पाळत आहेत असं म्हटलं होतं. त्याबद्दल बोलताना अजय गुजर यांनी म्हटलं की, सदावर्ते हे वकील आहे. वकिलांनी वकिलांचं काम करावं. सदावर्ते म्हणतात तसं हा दुखवटा असला तरी तो दुखवटा शांततेत करायचा असतो, नाचून भजनकीर्तन करून दुखवटा करू नये. हा दुखवटा शांततेत करायला हवा."
सदावर्ते आणि गुजर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर संपाबाबत आंदोलकांमध्ये फूट पडली आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.