सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (08:48 IST)

काळ्या वर्तुळांपासून मुक्ती मिळवा, डागरहित चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी या प्रकारे करा गुळाचा वापर

खराब जीवनशैली आणि आहारामुळे बहुतांश लोकांची त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. लहान वयात चेहऱ्याचा निर्जीवपणा सर्वांनाच तणावात टाकतो. यासाठी अनेकांकडून हजारो रुपये पार्लरमध्ये पाण्यासारखे खर्च केले जातात. पण तरीही त्यांना अपेक्षित चमक मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी बनवलेला हा फेस पॅक वापरू शकता.
 
गुळात भरपूर पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आरोग्यासोबतच ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गूळ त्वचेला चिकटपणाच देत नाही तर मॉइश्चरायझिंग होण्यास मदत देखील करतं. यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव होतो. इतकंच नाही तर वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि काळी वर्तुळे आणि डागांवर उपचार करण्यातही मदत होते.
 
फेस पॅक बनवण्यासाठी सामुग्री
एक चमचा बेसन
एक चतुर्थांश चमचा बारीक गुळ
एक टीस्पून तूप
जरा मध
एक चमचा दही
 
कृती
एक बाउलमध्ये सर्व वस्तू टाकून मिसळून घ्या. नंतर चेहर्‍यावर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. सुमारे 20 मिनिटे लावून ठेवा नंतर पाण्याने धुऊन घ्या.