शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (12:03 IST)

गुलाबच्या पाकळ्या घालून केला जातो पुण्यातील अमृततुल्य गुळाचा चहा

हिवाळ्यात चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. जे लोक या ऋतूत चहा पीत नाहीत ते देखील चहा पिण्यास सुरुवात करतात. शरीरात उबदार राहण्यासाठी लोक हे पेय पितात. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असली तरी. काही लोक त्यात आले घालून बनवतात, तर काही लोक इतर मसाले घालून पितात. मुंबईत चहामध्ये पुदिना टाकला जातो. दुसरीकडे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर इथला गुळाचा चहा खूप प्रसिद्ध आहे. या चहाची चव रोज पित असेलेल्या चहापेक्षा खूप वेगळी असते. मात्र, थंडीत हा गरम चहा प्यायल्याने शरीर उबदार राहते. ते कसे बनवायचे ते जाणून घ्या-
 
साहित्य-
लवंग, वेलची, काळे मिरे, दालचीनी, आलं, गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, तुळशीचे पानं, गुळ, सूंठ, तुळस, दूध, चहापत्ती, पाणी.
 
कृती- 
गुळाचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीचे पानं घाला. आता लवंग, वेलची, काळेमिरे, दालचीनी, आलं, सूंठ आणि गुलाबाच्या पाकळ्या कुटून घ्या. पाणी उकळल्यावर कुटलेला मसाला त्यात घालून द्या. नंतर यात चहापत्ती घालून उकळून घ्या आणि मग गुळ घाला. छान शिजल्यावर यात दूध मिसळून किमान सात ते दहा मिनिट शिजू द्या. गुळाचा चहा तयार आहे.