मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (16:41 IST)

व्हिटॅमिन बी 2 चा खजिना चविष्ट केळी बदाम शेक

उन्हाळ्याच्या हंगामात काही थंड प्यावंसं वाटते. परंतु सध्याच्या कोरोनाकाळात आरोग्याची काळजी घेणं देखील महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आपण घरात पौष्टीक शेक बनवून पिऊ शकता. हे प्यायल्याने आपल्याला थंडावा मिळेल. तसेच आवश्यक व्हिटॅमिन देखील मिळतील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून  घेऊ या. 
 
साहित्य- 
2  केळी, 1 लहान चमचा पांढरे तीळ, 1/2 चमचा वेलची पूड, बदाम,दूध. बारीक केलेले सुकेमेवे.
 
कृती- 
सर्वप्रथम केळीची साले काढून ते हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यांना फ्रीजमध्ये 12 तास ठेवा. यानंतर, तुकडे करून मिक्सरमध्ये घाला. 1 लहान चमचा पांढरे तीळ,चिमूटभर वेलची पूड,1 कप बदाम दूध, मिक्सर मध्ये घाला.चांगले फेणून घ्या. थंडगार बदाम शेक तयार. काचेच्या ग्लासात भरून वरून बारीक केलेले सुकेमेवे घाला.आणि सर्व्ह करा. उन्हाळ्यात हे आपल्याला पोषक घटक देईल आणि थंडावा देखील मिळेल.