शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (10:59 IST)

Immunity Booster Tea दालचिनी चहा, जाणून घ्या कृती

कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. आयुर्वेदात देखील अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्या आहे ज्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते. त्यापैकी एक म्हणजे दालचिनी चहा. या चहाचे सेवनाने अनेक फायदे होतात-
 
दालचिनी चहा पिण्याने वजनावर नियंत्रण राहतं. 
याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढते. 
दालचिनी चहामध्ये आढळणार्‍या पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडेंट्स तत्वामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
या चहाचे सेवन केल्याने हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.
या चहाने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
या चहाचे सेवन केल्याने मासिक पाळी दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते.
आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे यान रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते.
 
दालचिनी चहा बनविण्याची कृती –
एका भांड्यात पाण्यासह थोडी दालचिनी चांगल्याप्रकारे उकळवून घ्या. 
दालचिनी चांगली उकळल्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या. 
आवडीप्रमाणे ‍आणि गरजेप्रमाणे यामध्ये थोडे आले सुद्धा टाकू शकता. 
आवाडीनुसार मध किंवा लिंबू रस मिसळून प्या.