शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (08:45 IST)

व्हायरल ताप टाळण्यासाठी 5 घरघुती टिप्स अवलंबवा

बदलत्या हंगामात व्हायरल ताप येण्याची भीती असते. आम्ही आपल्याला 5 घरघुती उपाय सांगत आहोत. या पूर्वी व्हयरल तापाची लक्षणे जाणून घ्या. 
 
व्हायरल ताप असेल तर घशात वेदना,डोके दुखी,डोळे लाल होणं,कपाळ तापणे,खोकला,थकवा,उलटी,आणि अतिसार सारखे लक्षणे दिसतात. हे संसर्गजन्य आहे. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो. या पासून बचाव साठी काही घरगुती उपचार आहे. चला जाणून घेऊ या.
 
1 हळद आणि सुंठ पूड-  
सुंठ म्हणजे आल्याची पूड,आल्यात तापाला बरे करणारे गुणधर्म आढळतात. या साठी एक चमचा हळद,एक चमचा सुंठपूड,आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या. या मुळे व्हायरल ताप नाहीसा होतो. 
 
2 तुळस वापरा- 
तुळस मध्ये अँटोबायोटिक गुणधर्म आढळतात या मुळे शरीरातील विषाणू नष्ट होतात. म्हणून एक चमचा लवंग पावडर मध्ये 10-15 ताजे तुळशी ची पाने 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी अर्ध होई पर्यंत उकळवून घ्या. गाळून थंड करून दर एका तासाने पिऊन घ्या. असं केल्याने व्हायरल ताप नाहीसा होईल. 
 
3 धणे घालून चहा प्या-
धण्यात औषधी गुणधर्म आढळतात. याचा चहा बनवून प्यावा. या मुळे देखील व्हायरल बरा होतो. 
 
4 मेथीचे पाणी प्यावे-
एक कप मेथीदाणे रात्रभर भिजत घाला आणि सकाळी गाळून दर एक तासाने पिऊन घ्या.
 
5 लिंबू आणि मध -
लिंबाचा रस आणि मध देखील व्हायरल तापाच्या प्रभावाला कमी करतात. आपण मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता.