शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (17:40 IST)

योग करा प्रतिकारक शक्ती वाढवा

अद्याप कोरोना पूर्णपणे गेलेला नाही,तर याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सध्या याच्यावर प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना लसीकरण देण्यात येत आहे. आपण आपल्या प्रतिकारक शक्तीला वाढवून या रोगाशी लढू शकता. योगामध्ये अनेक आजाराला दूर करण्यासाठी बरेच योग आहे ज्यामुळे आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून स्वतःचा बचाव करू शकता. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगाचे हे 6 उपाय करावे. 
 
1 अंग-संचालन -याला सूक्ष्म व्यायाम देखील म्हणतात. हे आसन च्या सुरुवातीला केले जाते. या मुळे शरीर आसनासाठी तयार होतो.सूक्ष्म व्यायाम मध्ये डोळे,मान,खांदे, हात आणि पायाचे टाच, गुडघे, खुबा, कुल्हे,ह्याचा व्यायाम होतो.माणूस निरोगी आणि तंदुरुस्त राहतो आणि रोगांशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
 
2 प्राणायाम- अंग संचालन करताना जर आपण या मध्ये अनुलोम- विलोम प्राणायाम समाविष्ट करता तर एक प्रकारे हे आपल्या अंतर्गत अंगाला आणि सूक्ष्म नसांना शुद्ध आणि निरोगी करतो. शरीरातील विषारी टॉक्सिन काढून प्रतिकारक शक्ती वाढवतो. 
 
3 योगिक आहार- अन्नाला चांगल्या ठिकाणी आणि स्वच्छ आणि शांत मनाने ग्रहण केल्याने ते अमृतासम असतो. अन्न सकस,पौष्टिक, स्वच्छ,ताजे असावे. गायीच्या दुधाने बनलेले असावे. अशा प्रकारच्या सात्विक अन्न खाल्ल्याने माणूस निरोगी राहतो. आहार तीन प्रकारचे असतात. सात्विक,तामसिक राजसिक.योगिक आहारात सांगितले आहे की काय खावे आणि काय नाही. याचे तीन प्रकार आहे.  - मिताहार, पथ्यकारक आणि अपथ्यकारक.
* मिताहार -म्हणजे सीमित आहार घेणं , म्हणजे जेवढी आपली खाण्याची क्षमता आहे तेवढेच अन्न घ्यावे. या मध्ये जेवण असे असावे की जे खाण्यासाठी योग्य असावे.जे चविष्ट असावे. 
 
4 उपास-आयुष्यात उपवास असणे आवश्यक आहे. उपास केल्याने शरीरातील विषारी टॉक्सिन निघून प्रतिकारक शक्ती वाढते. 
 
5 मॉलिश- मॉलिश केल्याने शरीरात रक्त विसरणं चांगले होते. तणाव आणि नैराश्य दूर होतो. शरीराची त्वचा उजळते, कोणतेही रोग आणि व्याधी होत नाही. मॉलिश घर्षण, दंडन,थपकी आणि संधी प्रसारण पद्धतीने करावी.
 
6 योग हस्त मुद्रा- योग हस्त मुद्रा केल्याने निरोगी शरीर मिळतो. हे मेंदूला देखील निरोगी ठेवते. हस्तमुद्रा नेहमी योग्य पद्धतीने आणि शिकून करावी. ते फायदेशीर आहे. या मुद्रा प्रत्येक रोगासाठी फायदेशीर आहे. आणि करायला देखील सहज आहे.