1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (17:29 IST)

होळी निमित्त खास खाद्य पदार्थ चमचमीत भांगेची चविष्ट भजी

holi
आपण भजी तर नानाप्रकारे खालली असणार. आज आम्ही होळीच्या सणा निमित्त खास भांगेची भजी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती लिहून घ्या 
 
साहित्य- 
एक कप, हरभराडाळीचे पीठ, मीठ,हळद, तिखट,आमसूलंपावडर, अर्धा चमचा भांगेच्या पानाची पेस्ट ,2 कांदे बारीक चिरलेले, दोन बटाटे चिरलेले, तळण्यासाठी तेल .
 
कृती- 
सर्वप्रथम एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ घ्या.त्यात हळद, तिखट, मीठ,आमसूलपावडर ,भांगेच्या पानाची पेस्ट सर्व जिन्नस एकत्र करून  लागत लागत पाणी घालून मिसळून घ्या. मिश्रण मध्ये गरम तेलाचे मोयन घालून ठेवा. नंतर एका कढईत तेल तापत ठेवा आणि तेल गरम झाल्यावर त्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा,आणि बटाटे चिरून घाला आणि ढवळून घ्या. आता भजी गरम तेलात सोडा आणि सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या .गरम भजी सॉस सह सर्व्ह करा.