रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 14 मार्च 2021 (08:24 IST)

चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे कांदा खास 5 गोष्टी जाणून घ्या.

आहारामध्ये सॅलड म्हणून आपण कांदा वापरतो कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचेसाठी देखील कांदा उपयोगी आहे. चला तर मग ह्याचे 5 खास फायदे जाणून घ्या. 
 
1 उन्हाळ्यात कांदा खाण्यासाठी नव्हेच तर त्वचेवर घासण्यासाठी देखील वापरला जातो. हा त्वचेची उष्णता शांत करतो आणि शरीराचे तापमान संतुलित करतो. 
 
2 पायाच्या तळांमधील होणारी जळजळ देखील या मुळे कमी होते. या साठी कांदा किसून पायाच्या तळाला लावा. हे उन्हाळ्यात उष्णतेचा प्रभाव कमी करतो. 
 
3 त्वचेमधील संसर्ग दूर करण्यासाठी कांद्याचा रस किंवा किसलेला कांदा लावल्याने फायदा मिळतो आणि त्वचेमधील होणारे संसर्ग देखील नाहीसे होतात. 
 
4 डास चावल्यावर पुरळ आल्यावर सूज येते आणि त्वचा लालसर होते, त्यासाठी आपण त्यावर कापलेला कांदा लावा. सूज आणि लालसर पणा कमी होईल. 
 
5 डोक्याच्या त्वचेवर कांदा लावल्याने केसांची गळती थांबते आणि उवा झाल्या असल्यास कांदा डोक्यात चोळल्याने उवा देखील मरून जातात.